या पुस्तकाविषयी
आपली 'भाकरी आणि फूल' ही कादंबरी वाचली. खूप आवडली. गेल्या पंचवीस वर्षांतील एका अस्पृश्य कुटुंबाच्या स्थित्यंतराचा आलेख आपण समृध्दपणे रेखाटला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झपाटलेला परंतु परिस्थितीने कधी कधी असहाय होऊन चरफडणारा आणि मग देशाविरुध्द- धर्मग्रंथांविरुध्द बंडाची भाषा बोलणारा गोपाळ आणि विद्रोही मनाचा आविष्कार असलेला आनंद ज्वलंत आहेत. परंपरा न झुगारू शकणारा गोपाळचा बाप नि जीवनाविषयी काही अपेक्षा बाळगणारा पांडुरंग, गोपाळची पत्नी ही आणखी काही विलक्षण पात्रे. महारांच्या घरातील, त्यांच्या वागण्यातील, समाज प्रवृत्तीतील आपण अनेक बारकावे टिपले आहेत, त्याचा मला विशेष आनंद झाला.'भाकरी आणि फूल' ही एक समर्थ कादंबरी आहे. गंगाधर पानतावणे
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
सन्मान
भाकरी आणि फूल’ — मधु मंगेश कर्णिक यांची समर्थ कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट
मधु मंगेश कर्णिक यांची सामाजिक परिवर्तन आणि आंबेडकरी विचारांची कादंबरी ‘भाकरी आणि फूल’ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.