भूमिका आणि उत्सव

Bhoomika Ani Utsav

लेखक आशा बगे | Asha Bage
प्रकाशक
Mouj Prakashan Gruh
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आशा बगे यांच्या या दोन कादंब-यांत नव्या-जुन्या पिढयांतील माणसांचा आयुष्याकडे पाहण्याचा दॄष्टिकोन चितारताना मानवी नातेबंधांची उत्कट रूपे चित्रित होतात-ती जीवनाबद्दलच्या खोल चिंतनशील जाणिवेतून. ’भूमिका’मधले आजी-आजोबा आपल्या मुलीच्या पश्चात तिच्या मुलाला आपल्या संस्करांत वाढवताना, आपल्या सुखदु:खांचा अन्वयार्थ लावत आपले आयुष्य पुन्हापुन्हा नव्याने त्या दु:खासह समजून घेऊ पाहतात. प्रसूतितज्ज्ञ सुरू आणि साधी, संसारी पण संवेदनशील मनाची माधवी यांच्या मैत्रिबंधाची कथा ’उत्सव’मध्ये येते. दोघींच्या वाटयाला आलेल्या एकटेपणाचे रंग वेगळे-पण दोघींच्या मैत्रीतला धागा माणसांना दुभंगून टाकणा-या याच एकटेपणाचा. याच एकटेपणाने आयुष्याकडे समंजसपणे पाहण्याची दाखवलेली प्रगल्भ, स्वयंभू वाट... मानवी जीवनाचे, नातेसंबंधांचे विभ्रम या दोन कादंब-यांतून पुरेशी अलिप्तपणे साकारणारी आशा बगे यांची शैली व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या आयुष्यासकट वाचकांसमोर जिवंत उभी करत जाते. त्यातले चिंतन वाचकांना विचार करण्याचा अवकाश पुरवत राहते.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

आशा बगे | Asha Bage

आशा बगे या मराठी कादंबरीकार आणि कथालेखिका आहेत. स्त्रियांचे अंतर्जीवन, कौटुंबिक नाती आणि बदलत्या समाजाचे ताण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून बारकाईने उलगडतात. २८ जुलै १९३९ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या बगे यांनी तेथील लेडी अमृतबाई डागा महिला महाविद्यालयातून मराठी (१९७१) आणि संगीत (१९७८) या विषयांत एम.ए. क…

संपूर्ण परिचय पाहा
More by Asha Bage

आशा बगे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like