जगणं वाचणं

Jagana Vachana

प्रकाशक
Varnamudra Publishars
प्रकाशन वर्ष
२०२३
पृष्ठे
२९८
ISBN
9788195374656
भाषा
मराठी

₹४४४

सर्व करांसह

फक्त २ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

एक राजाविज्या आहे, एक गती आहे, गती प्रगती जागृती. एक फिरदोस आहे, रणधीरे सर आहेत. ही कादंबरीतील पात्रांची केवळ नावे नसून, एकाच ध्यासाने पछाडलेल्या राजाविज्याच्या ध्यासाला फुलवत जाणारी, जोपासणारी प्रतीके आहेत.


बालपणीच पोरकेपण आलेल्या, अनाथ झालेल्या, कुठेतरी आश्रिताचे आयुष्य कंठणाऱ्या राजाविज्याच्या आयुष्यात पुस्तकांचा प्रवेश होतो. छंदाचे, आवडीचे, रूपांतर हळूहळू ध्यासात आणि पुढे वेड लागण्याच्या पातळीपर्यंत वाढत जाते. पण ज्या पुस्तकांनी वेड लावलेले असते तीच पुस्तके राजाविज्याला वेळप्रसंगी सावरतात, तारून नेतात.


कसलं ना कसलं खूळ डोक्यात घेऊन माणसे जगतात, झुंज देतात, जिंकतात, पराभूत होतात, मोडून पडतात, विझतात. पण माणूस खरंच पराभूत होत असतो का? हेमिंग्वे हे नाकारतो, तो म्हणतो 'यू कॅन डिमॉलिश मॅन बट यु कान्ट डीफिट हिम.' हेमिंग्वेचा म्हातारा न हरता, हताश न होता देवमाशाशी झुंज देतो आणि अखेरीस सांगाडा घेऊन किनारा गाठतो. समुद्रकाठावर पसरलेल्या माशाच्या सांगाड्याचे धूड म्हाताऱ्याने संकटाला तोंड दिलेल्या जिद्दीची, दुर्दम्य आशावादाची कहाणी सांगते.


राजाविज्याची ही अशीच एक झुंज आहे, 'जगणं वाचणं' ह्या कादंबरीतून लेखकाने ती काव्यात्म लयीत पेश केली आहे. राजेंद्र मलोसे हे आपल्या स्वतःच्याच एका स्वतंत्र कुळाचे लेखक आहेत. 'जगणं वाचणं' ह्या पुस्तकातून त्याचा पुनःप्रत्यय येईलच.


राजाविज्याची, गती प्रगती जागृतीची, फिरदोसची, रणधीरे सरांची ही कहाणी ऐकून संपल्यावरही, फांदीवरून पक्षी उडून गेल्यावरही जशी डहाळी झुलत राहावी, तशी वाचकांच्या मनात झुलत राहील.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. राजेंद्र मलोसे | Dr. Rajendra Malose

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Rajendra Malose

डॉ. राजेंद्र मलोसे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like