मराठी कादंबरी

जंगल

Jangal

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१९६
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054494
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

माणूस-माणसांचे जगणे हे सुसंस्कृत संभावित सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून सतत उन्नत व्हावे, पशुपातळीवरचे आदिमपण संस्कारांनी-नैतिक बंधनांनी उजळून जायला हवे. आपण सृजनशील कामप्रेरणा जीवनप्रेरणांमध्ये रूपांतरित करताना कुटुंब, लग्न, समाज, धर्म-संस्कृती अशा व्यवस्था निर्माण करीत आलो आहोत. प्रेम, नाती, पातिव्रत्य, नैतिक आचरण, संबंधांतील निष्ठा, व्यापार-व्यवहार संस्था आदिंच्या निर्मितीत सांस्कृतिकरण अपेक्षिले जाते. मात्र त्यातही काम-अर्थ या पुरुषार्थ साधनेचा जाच वाढावा आणि पुन्हा रानटी व्यवस्थेचेच पुनरुत्थान घडवावे का? दांभिकपणा हेच जीवनसत्त्व व्हावे का? आपण निखळ मानुषता आविष्कृत करू शकू का?


...अशा प्रश्नमालिकांचा जन्म 'जंगल'मधून होतो. पंकज कुरुलकर यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीत, आशयसूत्रांच्या निवडीत, सादरीकरण पद्धतीत, सूक्ष्म संघर्षशीलता दिसते. त्यांच्या साहित्याच्या जीवनाशयात व जीवनदृष्टीत असांकेतिक अनोखेपण आहे. परंपरागत रुढावलेल्या, पुढारलेल्या आणि निर्वावलेल्या स्त्री-पुरुष संबंध, नर-मादी संबंध, व्यक्ती-व्यक्ती संबंध, कौटुंबिक संबंध अशा मूल्यसंबंधांच्या जाळ्यांना परंपरा विचलनाच्या कृती छेदतात. प्रतिकारी नैतिकतेचा आघाती आत्मसूर येथील पात्रांच्या आत्मकथनांना-आत्मशोधांनाही प्राप्त होतो.


शारीरिक आकर्षण, प्रेम, वासना, कामतृष्णा आणि नैतिकता यांच्यातील सूक्ष्म संघर्ष या कादंबरीत चिंतनिका, जाणिवा-नेणिवा, विचार-विवेक यांना ठणका देणारा ठरतो. पात्रांच्या आत्मरतीमुळे नैसर्गिकता, वास्तविकता आणि नैतिकता यांनाच या निवेदनांमधून झुंजत ठेवले जाते आणि वाचकाला कथाशयात विसर्जित व्हावे लागते...


- एकनाथ पगार

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

जंगल — highlight जंगल — highlight जंगल — highlight जंगल — highlight जंगल — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Pankaj Kurulkar

पंकज कुरुलकर | Pankaj Kurulkar

संपूर्ण परिचय पाहा
More by Pankaj Kurulkar

पंकज कुरुलकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like