या पुस्तकाविषयी
नामदेव कोळी यांचा 'काळोखाच्या कविता' हा पहिलाच संग्रह. खरं म्हणजे काळोखाचे संदर्भ घेऊन सहज सोप्या अवतरणातून सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारी ही कविता आहे. ही कविता सामान्य माणसांच्या आयुष्यातील काळोखाची असली तरी, त्यांच्या जगण्याभोवतीच्या अवकाशात कधीतरी उजाडण्याचे स्वप्रही पाहते. दुःखाच्या नदीप्रवाहातून सुखाची मरणं शोधणारी माणसंही या कवितेत येतात. मनात रुतून बसलेला पडीक गाव आणि स्थलांतराच्या मधोमध होणारी घुसमट कवीला बदलत्या वास्तवात रुजू देत नाही. त्यात बोटांच्या चिमटीतून सुटून गेलेले गावही कबीला सन्मानाने जगू देत नाही. सालोसाल दुःखाच्या आडोशाने व्यतीत झालेला काळ, मायबाप आणि बहिणींच्या आठवणींनी भरून काढताना होणारी तगमग आणि जगण्यातील तपशील भरून काढतानाचे ऊर्ध्वपातन म्हणजे ही कविता आहे. ह्या कवितेच्या पार्श्वभूमीवर विचार करताना ग्रामीण पातळीवर न बदललेल्या वास्तवाला ही कविता अधोरेखित करते. त्यांचे परंपरागत जगण्याचे परिवेष, शोषणाच्या रितीभाती, रिवाज, चाली अजूनही त्याच मातीच्या सनातन घडणीच्याच आहेत. दहशतीच्या आहेत. त्यात कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याने, त्याची समकालीनता भंगली नाही. म्हणून या वास्तवाचे आजच्या कवितेत असणे महत्त्वाचे आहे. ही अवकळा सोसलेल्या काळोखातून काजव्यांसारखा उजेड घेऊन जाणाऱ्या अगतिकांचाही हा परावभच आहे. केवळ कवी म्हणून असणारे अस्तित्व या परिस्थितीला सामोरे जाताना दिसून येते. या कवितेत अभिनिवेशाच्या जागा अगतिकतेने भरलेल्या आहेत. परिस्थितीला आपलेसे करीत कलाकलाने आपल्या आवाक्यातील बदलांचा मार्ग शोधणे या कवितेचे स्वतंत्र असे प्रारूप आहे. यातील तत्रैवता भयावहतेच्या जवळ जाणारी स्थिती आहे आणि मुंबई आपल्याला आज तरी सामावून न घेणारी सावत्र अशी गोष्ट आहे. दा. गो. काळे
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.