arrow_back Back to Books
कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा

कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा

Kankankkudri Tuntunttari Tapddatupdda

लेखक Vilas Patil
storefront Shabd Publication
qr_code ISBN: 9788196977856
calendar_today 2025
menu_book 154 pages
₹450
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

घोड्यांच्या लोकविलक्षण जगाचे दर्शन विलास पाटील यांच्या कवितेत आहे. घोडा आणि मानवसमूह यांच्यातील सहप्रवासाच्या अनंत छटा 'कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुण्डा' या दीर्घकवितेत आहेत. घोडा व मानव यांच्यातील अवस्थांतरणांच्या जाणीव-गोफांमधून टप्डाटुण्डा'चे अभिनव असे रिंगण आकाराला आले आहे. घोडा आणि ग्रामसंस्कृतीतील जाणीवनेणिवेचा अनोखा नकाशा त्यामध्ये रेखाटला आहे. घोड्याच्या विविध अवस्थांपासून ते त्याच्या मुक्तियात्रेचा प्रदीर्घ घट या कवितेत आहे. 'मानूस झाला ओडा लाग्ला झाग्रातीऽपाटी अशा वर्तमानातील विरोधप्रतिमांनी घोड्याचे विश्व अधिक उठावदार केले आहे. घोड्याविषयीचे हे समूहगान आहे. हे अश्वदर्शन संस्कृतीच्या बहुधारांना उजागर करणारे आहे, त्यामुळे ते सतत समाजसंस्कृतीसंदर्भात व्यक्त झाले आहे. लोकपरंपरेने जोपास-जोजावलेल्या घोड्याच्या विविधरंगी प्रतिमांचे त्यावर संस्कार आहेत. हे कथनकाव्य व्यक्ती, प्रदेश, संस्कृती व अनोख्या बोलीरूपांनी सजविले आहे. त्यात घोड्याशी संबंधित पुराकथांचा कल्पक सर्जनशील असा वापर आहे. ध्वनी, शब्द आणि वाक्यमोडणीचे अनेक प्रयोग आहेत. व्यक्ती, परिसर व सीमाबोली तसेच निव्वळ ध्वन्यानुकारी उच्चाररूपांचा थक्क करणारा वापर या कवितेत आहे. हाल्गी वाजताळा 'टप टप टप टप', 'टप्डाटुण्डा टप्डाटुप्डा', 'डंगडंग डंग', 'डॅग्चिक चिक्डंग' आणि 'छुळळूम्छुळळूम्खुळळूम्खुळ्ळूम्' अशा टापा-वाद्यवृंदी ध्वनींचा विलोभनीय असा नादमेळ साधला आहे. घोड्यांच्या अनेकरंगी प्रतिमांना दृश्यात्मकतेच्या अनेकमिती चलपरिमाणातून बहुआबाजीपण प्राप्त करून दिले आहे. देशी लोकबंध आणि बोलणे यास केंद्रवर्ती ठेवून टापांचा माहोल साजिवंत केला आहे, तो मराठीत अपूर्व आणि अपरिचित आहे. भाषेच्या अपरिचित वि-रचनेचे वेगळे भान त्यामध्ये आहे. मराठी काव्यसंस्कृतीला अनघड व अपरिचित बाटावा असा या कवितेचा रूपबंध आहे. भाषाविज्ञानालाही आव्हानप्रद ठरावा, अशा ध्वनिभाषारूप खेळाचा चमचमता भाषावकाश; या काव्यरूपात आहे. 'गेला घोडा व्हायल्या टापा' या काळविस्मृतीचे निनादभान देणारी, ही आग्ळी-अंग्ळी कविता आहे. रणधीर शिंदे

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like