लज्जा

Lajja

लेखक Taslima Nasrin
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
२४६
ISBN
9788177660050
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

तसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते.

दत्त कुटुंबीय - सुधामयबाबू, किरणमयी आणि त्यांची दोन मुलं, सुरंजन आणि माया-हे बांग्लादेशचे रहिवासी आहेत. बांग्लादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीचा समाजातील बहुसंख्याकांकडून अनन्वित छळ केला जात असतो, पण हे हिंदू कुटुंब मात्र या छळाला तोंड देत आपल्या मातृभूमीवरच राहणं पसंत करतं. आपल्या इतर आप्तस्वकीयांप्रमाणे ते आपला देश सोडून जायला तयार नसतात.

सुधामयबाबू हे एक नास्तिक.. देशप्रेमानं, आशावादानं, आदर्शवादानं भरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. आपली मातृभूमी आपल्याकडे पाठ फिरवणार नाही, आपल्याशी प्रतारणा करणार नाही, या भोळ्याभाबड्या आशेवर ते विसंबून राहिले आहेत.

आणि मग...

६ डिसेंबर, १९९२ रोजी भारतात काही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी बाबरी मशिर्ट में विनाश केला. साऱ्या जगानं या घटनेचा निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. हिंदूंच्या छळासाठी आणखी एक निमित्त मिळालं...

दत्त कुटुंबीयांवरही संकटाची कुऱ्हाड कोसळते. ते भरडले जाऊ लागतात. त्यांचं जीवन, त्यांचं छोटंसं विश्व उद्ध्वस्त होतं.

अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी मूलतत्त्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते आणि वाचकाला अंतर्मुख करते.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like