या पुस्तकाविषयी
फकीर मुंजाजी शिंदे उर्फ फ. मुं. शिंदे उर्फ सर्व मित्रांचा 'फ.मुं. एक कवी. एक सालस, निगवीं, अभिजात, बहुश्रुत व सर्वप्रिय असं लोभस व्यक्तिमत्त्व. पिंड कलावंताचा. व्यक्तिमत्त्व कवीचं. कुठलंही व्यासपीठ वर्ज्य नसलेला हा माणूस, श्रोत्यांच्या व रसिकांच्या मनात वसलेला. श्रेयाचे व सन्मानाचे सर्व प्रतिष्ठित संस्कार लेऊन आपल्या शब्दनिष्ठ ताकदीनं आविष्कृत होणारा हा काव्याविष्कार म्हणजे फ. मुं. शिंदे यांच्या काव्यतपश्चर्येची सशक्त फलश्रुती आहे. प्रतिष्ठितांच्या व प्रस्थापितांच्या यादीत केवळ 'कविता' या वाड्मयप्रकाराच्या शिदोरीवर, मान्यतेच्या सर्व निकषांवर तावून सुलाखून प्रस्थापित होत व राजमान्यतेसह लोकमान्यता मिळवत, असा हा कार्यकर्तृत्वाचा शिलालेख फ.मुं.नी मोठ्या हिमतीनं व हिकमतीनं मराठी साहित्य-प्रांतात गिरवून ठेवला आहे. आज सर्व मान्यवरांच्या यादीत फ.मुं. शिंदे हे नाव कवी म्हणून अग्रणी असणं हा साहित्य-शारदेच्या प्रांतातही प्रतिष्ठेचा भाग समजला जातो. माणूस आणि मानव्याच्या शोध-पर्वात त्याची कविता ही 'माणसाची' कविता बनली. त्याच्या कवितेला आत्मनिष्ठेचा पायाभूत आधार तसा सुरवातीपासूनच होता. त्या आधारावर ती आत्मशोधाच्या मार्गाने आपला भावाविष्कार विस्तारीत बाटचाल करू लागली ती आजपर्यंत न थांबता न थबकता ! हे त्याचे साहित्य-प्रांतातील निर्विवाद असे यश आहे ! त्याची 'काव्यनिष्ठा' ही समकालीनांच्या सर्व संस्कारापासून वेगळी रहात वर्तमानाचे जे भान व्यक्त करीत गेली ती काव्यनिष्ठा त्याच्या बहुश्रुत व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.