arrow_back Back to Books
मर्ढेकरांची कविता  स्वरूप आणि संदर्भ खंड पहिला

मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ खंड पहिला

Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh Khand Pahila

लेखक Vijaya Rajadhyaksha
storefront Mouj Prakashan Gruh
₹200
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

बाळ सीताराम मंर्डेकर हे आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी होत त्यांच्या कवितेमध्ये, भित्र भित्र पिढ्यांच्या व काव्यविषयक भूमिकांच्या समीक्षकांना समाधान व आव्हान-दोन्ही देण्याचे सामर्थ्य आहे. मर्देकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ हा डॉ० विजया राजाध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्देकरांच्या कवितेचा सशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय. या पहिल्या खंडात, सुरुवातीला मर्डेकरांच्या कवितेवरील समीक्षेचे संक्षिप्त समालोचन व एकूण नवकाव्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मर्देकरांच्या कवितेतील आशयसूत्रे आणि मर्देकरांची काव्यशैली व प्रतिमासृष्टी यांच्या विवेचनातून मर्देकरांच्या कवितेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. तसेच मर्देकरांच्या कवितेवरील आक्षेप, तिचा समकालीन व पुढील कवीवर पडलेला प्रभाव, मर्देकरांची परंपरा आणि मर्डेकरांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादा यांचाही सखोल विचार मांडलेला आहे. डॉ० विजया राजाध्यक्ष यांची जातिवंत रसिकता व गाढ व्यासंग यांचा आणि आस्वादक व विश्लेषक समीक्षादृष्टी यांचा विरळा संयोग असणाऱ्या, या 'साहित्य अकादमी' पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती होय. - प्रा० मीना गोखले

Book Images

About the Author

person

Vijaya Rajadhyaksha

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like