या पुस्तकाविषयी
हे केवळ कवितांचं पुस्तक नाही; ही मातीत रुतलेल्या पायांची, फाटलेल्या तळव्यांची आणि करुणार्त हातांची कहाणी आहे. नांगराच्या प्रत्येक घावातून उसळलेली वेदना, विहिरीच्या तळाशी साचलेली आशा, बैलांच्या डोळ्यात दाटलेला इतिहास आणि शेतकऱ्याच्या काळजात खोल रुतलेला पीळ हे सगळं या कवितांमध्ये जिवंत झालं आहे. इथे माती बोलते. आभाळ कधी देव तर कधी गुन्हेगार ठरतं. पाऊस आशा देतो आणि कधी अवकाळी होऊन लुटूनही नेतो. पण तरीही भेगाळलेल्या भुईतून अंकुर फुटतो, उन्हातून सावली जन्माला येते आणि निराशेच्या धुळीतून नवी पेरणी उभी राहते. घाम, अश्रू आणि जिद्दीने पेरलेली, आशेच्या सूर्यप्रकाशात उगवलेली ही शब्दांची शेती आहे. ज्यांनी रान अनुभवलं त्यांना यात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, पण ज्यांनी अनुभवलं नाही त्यांना 'नांगराच्या घाव' मधील वेदना एकदा ऐकावीच लागेल. प्रकाश होळकर
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
प्रकाशन सोहळा
नांगराचा घाव
दिगंबर देवढे यांचा शेतकरी, माती, श्रम, पाऊस, दुष्काळ आणि नव्या पेरणीच्या जिद्दीचे चित्रण करणारा काव्यसंग्रह; कवी प्रकाश होळकर…
पुरस्कार
‘नांगराचा घाव’ काव्यसंग्रहाला कै. जयश्री राम पाठक पुरस्कार जाहीर
कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहाला सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा मानाचा कै. जयश्री राम पाठक पुरस्कार…
सार्वजनिक वाचनालय, नाशिक