या पुस्तकाविषयी
संजीवनीची कविता मी अनेकदा वाचली. तसा तिचा पिंगा पुन:पुन्हा मनावर भिरंगत राहिला. खूपच नवं, भाषेचं, अनुभवाचं व खेड्यातल्या काल- परवाच्या वास्तवातल्या जगण्याचं रूप मी या कवितेत पाहिलं. खेड्याचे संदर्भ शब्द व वास्तव बहुतेक कवितांमध्ये असलेली ही कविता खूप वेगळं असं कवितारूप आपल्याला देऊन जाते. खोलवरची वेदना सांगणारी परिपक्व अशा प्रतिमांची ही कविता आपल्याला अस्वस्थ करते. संजीवनीच्या कवितेमध्ये निसर्ग, खेडे, आनंददायी प्रेम, सफल प्रेमाच्या असफल प्रेमाच्या. दुःखितांच्या अशा अनेक कविता आहेत. कितीही जग पुढे गेले, स्त्री-पुरूषाचे नवे नाते आले, तरी दोन चेहरे घेऊन जगण्यातली मुखवट्याची पुरूषी वरात संपलेली नाही. अशावेळी मुकेपणी न शब्द उच्चारता सारं काही सहन करणाऱ्या स्त्रिया खेड्यातल्याच नव्हे, तर शहरी, सुशिक्षित, सुसंस्कृत असणाऱ्याही आहेत. केवळ खोट्या लोकलाजेस्तव त्या दुःख उघड करीत नाहीत. ही दुदैवाची शोकांतिका आजही आपण उघड्या डोळ्यांनी सपक्ष पाहतो आहोत. अशा अनेक मुक्या स्त्रीत्वाची ही कहाणीच संजीवनी अतिशय संथपणे बोलकी करते. - ना. धों. महानोर
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.