मराठी कादंबरी

सतरा वळणं

Satara Valana

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
४७०
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054821
भाषा
मराठी

₹८००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सतरा वळणं : एका विद्रोही आत्मशोधाची गाथा

डॉ. गजानन पाटील यांची 'सतरा वळणं' ही कादंबरी केवळ एका किशोरवयीन मुलाची कथा नाही तर ती मानवी जाणिवांच्या गुंतागुंतीच्या कप्प्यांचा वेध घेणारा एक स्तिमित करणारा 'मानसशास्त्रीय राजवाडा' आहे. अठराव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा असलेला पवन सत्यवान वाघमारे हा या कादंबरीचा नायक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या अनाम संघर्षाचे एक जिवंत आणि अस्वस्थ रूप आहे.

जगासाठी 'घुमा' आणि 'अबोल' वाटणारा पवन आपल्या अंतर्मनात मात्र विचारांच्या महासागरातील उत्तुंग लाटांशी झुंज देत असतो. 'मी कोण आहे?', 'माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?' आणि 'सत्याचा उगम कुठे होतो?' यांसारखे अस्तित्ववादी प्रश्न त्याच्या मनात अहोरात्र धुमसत आहेत. आयुष्याची ही 'सतरा वळणं' म्हणजे त्याच्या जीवनातील ते १७ निर्णायक क्षण आहेत ज्यांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला केवळ आकारच दिला नाही तर त्याला स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळाशी जायला भाग पाडले.

मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या 'अचेतन मनाच्या' (Subconscious mind) सिद्धांताची सावली या कादंबरीवर दाटून येते. पवनचे जगणे हे त्याच्या बाह्य जाणिवांपेक्षा त्याच्या सुप्त आणि सामूहिक अचेतन मनाच्या गूढ लहरींनी अधिक व्यापलेले आहे. त्यात कौटुंबिक विसंगतीची धार या संघर्षाला अधिक तीव्र करते. सोशिकतेचा मेरुमणी असलेली आई 'माई आणि दांभिकतेचा मुखवटा ल्यालेले वडील 'सत्यवान वाघमारे' यांच्यातील दरीत पवनचे मन एकाकी पडते. परंतु हे एकाकीपण त्याला नैराश्याच्या गर्तेत न ढकलत अंतर्मुखतेचा नवा प्रकाश देते. त्याच्या डायरीतील शब्द हे केवळ कोरडे साहित्य नसून, ते 'कॅथार्सिस' अर्थात मनाच्या आत्मशुद्धीकरणाचे एक उपचारात्मक माध्यम आहे. स्वप्नातील तो गूढ वाडा, अथांग पसरलेला समुद्र आणि त्याला भासणारे अदृश्य आत्मे हे त्याच्या कल्पनेचे विलास विल नसून त्याच्या मानसिक अवस्थांचे आणि भविष्यातील ध्येयांचे मूक संकेत आहेत.

शिक्षणतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. गजानन पाटील यांनी पवनच्या मनोविश्वाचा जो बिलोभनीय पदर उलगडला आहे तो मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरणार आहे. किशोरवयीन मानसिक अस्वस्थतेला शब्दांचे सुंदर कोंदण मिळवून देणारी आणि सामाजिक साखळ्या तोडून सत्याच्या प्रकाशाकडे नेणारी ही मराठी साहित्य क्षेत्रातील एक 'सशक्त' कलाकृती आहे. या पहिल्या भागाच्या वाचनानंतर पवनच्या पुढच्या प्रवासाची ओढ लागणे अपरिहार्य आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

सतरा वळणं — highlight सतरा वळणं — highlight सतरा वळणं — highlight सतरा वळणं — highlight सतरा वळणं — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. गजानन पाटील | Dr. Gajanan Patil

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Gajanan Patil

डॉ. गजानन पाटील यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like