arrow_back Back to Books
सट्टक

सट्टक

Sattak

storefront Popular Prakashan
qr_code ISBN: 9788196919818
calendar_today 2024
menu_book 151 pages
₹500
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

सट्टक मधील 'सरवा', 'अस्तुरीमृग' आणि 'मृत्यू' या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कबी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडबा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा हा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा 'सरवा' बेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती 'अस्तुरीमृग' मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे बाचकाला सुन्न करून सोडतात. 'अस्तुरीमृग' मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर 'मृत्यू' या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते.

Book Images

About the Author

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like