वाचन प्रसंग
₹250
About This Book
आपण सगळे पुस्तक वाचतो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुस्तके जगतात. वैद्य पुस्तके अंथरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडं-टोपडं चढवतात. ते पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं ऐकतात-ऐकवतात. या तीव्र, उत्कट ओढीतून 'बाचनप्रसंग' लिहिलं गेलंय. वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांबर लिहिलेली रसाळ, मर्मग्राही टिपणं, असा 'वाचनप्रसंग'चा बाज आहे. पुस्तकाची थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही; पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि बाचनातलं सृजन वेचतात. मध्येच एखादी सुरेख आठवण कडाडून जाते; एखादं सूक्ष्म निरीक्षण किंवा अभिप्राय... आणि पुस्तकातला गर्भगूढ काळोख लक्कन् उजळून निघतो. हे 'बाचनप्रसंग'चं यश आहे. वैद्यांची शैली मनाची पकड घेणारी; मूळच्या रसिकतेला चिंतन नि प्रगल्भतेची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या लिखाणात साक्षेप आहे, शालीनता आहे. 'वाचनप्रसंग'च्या प्रत्येक पानावर त्र्यं. वि. सरदेशमुखांची वत्सल सावली रेंगाळतेय. वैद्यांची भूक अमर्याद आहे. कथा-कादंबऱ्या, प्रवासवृत्तांत, निबंध, इतिहास, नाटक, व्याख्यानं त्यांच्या तडाख्यातून काहीही सुटत नाही. बदलत्या काळात, नव्या संदर्भात अभिजात साहित्यकृतींची नवी वाचनं होतील. म्हणून 'वाचनप्रसंग'चं विशेष महत्त्व आहे, असं वाटतं पुस्तक ही एक सुंदर जखम असते नि ती कधीच भरून येत नाही. नीतिन वैद्यांची जखम सतत भळभळत राहो. - अंबरीश मिश्र
Book Images
About the Author
Nitin Vaidya
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review