या पुस्तकाविषयी
'आकु-आकु' म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मे. हे 'वरुआ' म्हणूनही ओळखले जातात. पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिद्धान्ताबद्दलची रहस्यमयता 'आकु-आकु'तून उलगडते. जगाचे टोक गाठायला निघालेल्या शोधमोहिमेस 'सागरी सफरींचे किस्से' तसेच विचित्र व भयाण अनुभव येतात. 'गुप्त गुहां'चे रहस्य व त्यांची मालकी सतत नवीन माहिती देते. पुरातत्त्वशास्त्रज्ञ रीड, स्क्योस वोल्ड यांनी दोन हजार पेक्षा जास्त मानवी अवशेष शोधून काढले. कोलंबसच्या हजारो वर्षे आधी 'इन्का इंडियन समाजा'ने प्रशांत महासागराकडे प्रवास केला व नवयुगाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. 'रानोराराकू' ज्वालामुखीविवराच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या प्रचंड अशा मूर्तीचे एका किनाऱ्यावरून दुसरीकडे न फुटता-तुटता जाणे म्हणजेच-पुतळे स्वतःहून चालतात... कसे काय? हे व इतर आणखी विचित्र रहस्ये, अनाकलनीय गूढ 'आकु-आकु' तून उलगडण्याचा प्रयत्न लेखक-नॉर्वेजियन प्रवासी-थॉर हेयेरडालने केला आहे. काय आहे 'इस्टर बेटा'वरील राक्षसांचे रहस्य? लंबकर्णांचे गुपित, 'गुप्त गुहां'चे गुपित, गुहेचा मूक पहारेकरी, स्वतःच्याच 'आकु-आकु'चे गूढ म्हणणे आहे तरी काय? चेटकिणीच्या शापाने पडलेले पुतळे, त्यानंतरची ही दंतकथा. या घटनेने 'ईस्टर बेटा'वरील सुवर्णयुग कायमचे खंडित झाले. भाले व इतर स्थानिक हत्यारे तिसऱ्या युगापर्यंत बेटावर पुन्हा निर्माण झाली नाहीत, हेही या उत्खननातून समोर आले. अर्ध्या शतकाहून अधिक काळ वैज्ञानिकांनी मृत लोकांच्या सांगाड्यांचा अभ्यास केला. 'इस्टर बेटा'च्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी 'मायथॉलॉजी-मिथक विद्या', 'आकु-आकु'तून दंतकथेप्रमाणे गूढरीत्या वाचकांसमोर येते. काय आहे, हे चमत्कारी गूढ 'आकु-आकुं'चे? जाणून घेऊ, या पुस्तकातून.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.