या पुस्तकाविषयी
बाउल
आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता
नवीन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटाव समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा
सरपटतांना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष स्वतःतही पण कुणाला डंख मारू नये
कुठेतरी कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं साऱ्यांना कवीमध्ये तेव्हाच काही मरून गेल्याच
आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू डोळ्यादेखत पचवत कवीने शांत निश्चल बसून राहाव स्थितप्रज्ञ व्हावं
त्याच्या भवतालची माती त्याच्या नकळतच ओली होत जावी आणि आपोआप गवत उगवत राहाव
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.