या पुस्तकाविषयी
काजव्यां'ना, म्हणजे 'चांदणफुलां'ना सृष्टीच्या चमत्काराची
तेजप्रतिष्ठा दिली जाते. निबिड अंधाररात्री, कुणी आपल्याला प्रकाश दाखवेल, या भरवशावर न राहता, ते क्षुद्र किडे स्वतःच प्रकाशमान होतात. ज्या झाडावर वसलेले असतात, त्यालाही ऐश्वर्यमान करून सोडतात. अतिसामान्य आयुष्य जगणारी, पराभूत वकुबाची वाटणारी काही माणसं, जिण्याच्या दाट संकटकाळात, 'अत्त दीप भव' प्रेरणेने, परिस्थितीवर अशी बाजी मारून जातात की त्यांचा जीवनवृक्ष कल्पवृक्षासमान भासू लागतो.
'चांदणफुला'तल्या साऱ्या कथा या पराभवालाच पराभूत करणाऱ्या अतिसामान्य माणसांच्या असामान्य कथा आहेत.. सुमेध वडावाला यांच्या प्रभावी शब्दकळेने त्या जणू तेजाळून उठल्या आहेत.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.