चनिया मनिया बोर

Chania Mania Bor

लेखक Chandrakant Khot
प्रकाशक
Dimple Publication
प्रकाशन वर्ष
१९९२
पृष्ठे
८७
भाषा
मराठी

₹९०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'चनिया मनिया बोर' या चंद्रकांत खोत नावाच्या लेखकाच्या अकरा गोष्टी आहेत. नऊ कलंदरांच्या नि दोन हार खाणाऱ्या लेखकाच्या स्वतःच्या गोष्टी म्हणे लहान मुलांसाठी आहेत. खरे असावे तें. कारण नाहीतर माझ्यासारख्या दुसऱ्या बालपणात इतकी वर्षे रममाण झालेल्या, साठी-नाठीच्या पलीकडे गेलेल्या बाईला त्या गोष्टींवर लिहिण्यासाठी नेमले नसते. म्हणूनच तर त्यांच्या आईने साक्षर व्हायचे ठाम नाकारले असावे. बरे, गोष्टीत जीवसृष्टीतले प्राणी आहेत. पण ते तरी वाघ, सिंह, हत्ती, लांडगा, कोल्हा किंवा ससा-हरिण हे झूमध्ये दिसणारे प्राणी तरी असावेत ? निदान सर्वांना हसवणारे माकड तरी ? शूर गरुड, सुंदर बोलका पोपट तरी ? छे! नाव कशाला ? चंद्रकांत खोत ज्या कलंदराच्या प्रेमात पडले आहेत. ते प्राणी-वीर कोण तर मुंगी (मुंग्यांचा थवाच्या थवा), झुरळ, घुंगरवाला कावळा, उंदीर आणि ढेकूण ! छीः मला वाटते त्यांच्या या वीररांना आरती ओवाळायला ही दुसऱ्या वयातली माझ्यासारखी लहानी म्हणूनच त्यांनी हुडकून काढली. म्हणजे आता दुसऱ्या बाळपणात शक्ती तर नाहीच पण युक्तीही फसण्याचाच संभव अधिक. नि फसगत झाली तर ती माझी, ते आपले चिर-आनंदीच.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like