या पुस्तकाविषयी
गर्भलिंग तपासणी करणं तसंच मुलीचा गर्भ असला तर काढून टाकणं, ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड सध्या इतकी वाढली आहे की, हे अवैध धंदे करणारे निर्लज्ज डॉक्टर मुलाचा गर्भ असला तरी पैशाच्या लालसेने मुलीचा गर्भ आहे असं खोटं सांगून तोही काढून फेकून देतात. त्यामुळे होतं असं की, तिच्या घरात ताणतणाव वाढतात. सौख्य हरवत. प्रसंगी त्या स्त्रीचं सांसारिक जीवन उद्ध्वस्त होतं. या कादंबरीतल्या सुनिताच्या बाबतीतही असं घडण्याची शक्यता होती; मात्र तिच्या बेडर व प्रसंगावधानी स्वभावामुळे ते टळतं. ज्या सासूनं, नवऱ्यानं तसंच ज्या डॉक्टरानं तिच्यावर ही वेळ आणली त्यांना अद्दल घडवायची या ईर्षेनं तिनं त्यांच्याशी केलेला संघर्ष, हा या कादंबरीचा विषय आहे. या संघर्षात डॉ. दमयंती घाडगे यांची तिला मिळालेली खंबीर साथ विशेष अर्थपूर्ण आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.