हरून आणि गोष्टींचा समुद्र

Haroun Aani Goshtincha Samudra

लेखक Salman Rushdie
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१७०
ISBN
9789357207881
भाषा
मराठी

₹२८०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

एक अगदी दुःखी दुःखी शहर होतं. जगातलं सगळ्यात दुःखी शहर. ते शहर इतकं दुःखग्रस्त होतं की त्याला त्याचं नावही आठवत नव्हतं. या शहरात व्यावसायिक कथाकथन करणारा रशीद आणि त्याचा मुलगा हारुन राहायचे. रशीद म्हणजे बकवासोंका बादशाह. खयालातोंका दरिया. भन्नाट गोष्टी सांगायचा. दर खेपेला नवीन. जुनी एकही परत नाही. फक्त एकच नाही. शेकडो गोष्टी मिळतील तुम्हाला. धमाल आणि दुःखी गोष्टी. एकामागून एक चेंडू एकाचवेळी उडवत झेलावेत तशा. त्यात चेटूक आहे. त्यात प्रेम आहे. राजकन्या आहेत. दुष्ट काका मामा आणि लठ्ठमुठ्ठ आत्या मावश्या आहेत. पिवळ्याजर्द चौकटीच्या पॅटी घातलेले मुच्छड गुंड आहेत. सहज गुणगुणायला लागाल अशाच डझनभर उडत्या चाली आहेत. पण एके दिवशी -- बऱ्याच गोष्टी बिनसतात. भयानक बिनसतात. रशीदची बायको रशीदला सोडून जाते. मग रशीद गोष्ट सांगायला तोंड उघडतो तर त्याच्या तोंडातून गोष्टीच्या ऐवजी नुसताच भीषण केकाटण्याचा आवाज येतो. बकबासोंका बादशाह त्याचं गोष्टी सांगण्याचं कौशल्य गमावतो. काहीतरी बाईट घडलेलं असतं. त्याला माहितीच नसतं : कुठंतरी कोणीतरी गोष्टींच्या मूलस्रोतात विष कालवत असतं. खत्तम-शुद भाषेचा जानी दुष्मन, खामोशीका शहजादा- जुबांका हरीफ साक्षात गोष्टींचा समुद्र प्रदूषित करायची गुप्त कारस्थानं रचतो. हारुन आणि गोष्टींचा समुद्र ही साहस-कथा आहे. अब्बू आणि बेटा, रशीद आणि हारुन यांची गोष्ट आहे. हारुननं त्याच्या अब्बूला त्याचं गोष्टी सांगण्याचं कौशल्य परत मिळवून देण्यासाठी, त्याच्या निराशेतून त्याची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट आहे. यात एक पागल बस चालक आहे पण नाव त्याचं आणि एक जल-जिन्न आहे - उफ्फ. तरंगणारा माळी आहे आणि अंगभर बडबडणारी तोंडं असलेले सतरातोंडी मासे आहेत. यात एक मस्त गप नगरी आहे (जी कायम उजेडात असते) आणि भयानक चूप नगरी आहे (जी कायम अंधारात असते) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फागुंसांअ आहे. फार गुंतागुंतीची सांगायला अवघड.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like