काळी आणि पंढरी

Kali Ani Pandhari

लेखक Shri K. Vanpal
प्रकाशक
Deshmukh And Company
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२६६
ISBN
9788195808854
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

श्री. के. वनपाल हे महसूल खात्यातील एक अधिकारी होते. या खात्यात ते मामलेदार म्हणून दाखल झाले पण शेवटी आदिवासी महामंडळाचे महासंचालक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या काळात एक निष्कलंक चारित्र्याचे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. वनपालांबद्दल दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताशी आपली बांधिलकी मानून ही सरकारी नोकरी केली. वनपाल यांचे नोकरीनिमित्त पंढरपूर नगरीत दीर्घ काळ वास्तव्य होते. केवळ पंढरपूरमधील त्यांच्या वास्तव्यावर त्यांनी 'भीमतटीचे भक्तिपीठ' या शीर्षकाखाली नऊ लेख लिहिले आहेत. हे सर्व लेख नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेले असल्यामुळे ही लेखमाालाा अतिशय वाचनीय झाली आहे. शासकीय सेवेतल्या अनेक उच्चपदस्थांनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा तपशील देणारी, पुस्तके सतत प्रसिद्ध होत असतात. परंतु शासकीय सेवेतल्या ज्या अधिकाऱ्याचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि जे डोळसपणे जनतेच्या स्थितिगतीचा वेध घेतात अशा मामलेदारासारख्या अधिकाऱ्यांच्याही आठवणी प्रसिद्ध झाल्या पाहिजेत कारण अशी पुस्तके आपल्या सामाजिक इतिहासाची प्राथमिक सामग्री असतात. त्यांच्यातूनच सामाजिक इतिहास साकार होत असतो. म्हणून वनपाल यांच्या या पुस्तकाला मोल आहे. सुधीर रसाळ

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like