या पुस्तकाविषयी
गेल्या अर्धशतकापासून शान्ताबाई काव्यलेखन करीत आहेत. इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले, तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वांत आवडीची निर्मिती राहिली आहे.
'किनारे मनाचे' हा शान्ताबाईंच्या दीर्घकालीन काव्यप्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे. सुप्रसिद्ध कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ. प्रभा गणोरकर यांनी शान्ताबाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखवला आहे. तिचा आशय, आविष्कार, भाषेचे पोत, तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती, त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण, मूलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ. गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल. एका ज्येष्ठ कवयित्रीच्या या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाची ही सर्वांगीण समीक्षा काव्यरसिकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उद्बोधक वाटेल.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.