पखाल

Pakhal

लेखक Babarao Musale
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
१९९५
पृष्ठे
१६८
ISBN
8171614531
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'शरदबाबू म्हणाले होते, 'मी आयुष्यभर बंगालचे अश्रू पाहिले.' त्या अश्रूची चरित्रे म्हणजेच शरदबाबूंच्या कादंबऱ्या. तुम्ही वन्हाडातल्या एका खेड्यातले असेच अश्रू पाहिले जिथे भुकेच्या वेळी भाकर लाभो ही इच्छादेखील 'हाल्या'कडे दुधू मागण्यासारखी निष्फळ ठरते, अशा कुटुंबातले अश्रू कादंबरी होऊन आले.' बाबाराव मुसळ्यांच्या 'हाल्या हाल्या दुधू दे' या तिसऱ्या पिढीची एकमेव कांदबरी म्हणून पुरस्कृत केलेल्या कादंबरीवरील श्री. पु. ल. देशपांडे यांचा हा अतिशय बोलका अभिप्राय, 'हाल्या हाल्या दुधू दे'च्या परंपरेला साजेशीच ठरणारी 'पखाल' ही मुसळ्यांची आणखी एक कादंबरी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात राहणाऱ्या बलुत्याच्या मोबदल्यात परंपरेने पखालीने पाणी भरणाऱ्या कोळी समाजाच्या नशिबी आलेले दैन्य दारिद्रय शोषण, उपहास, व्यथा, वेदना, अज्ञान, नवे तंत्रज्ञान विज्ञान यांच्या आविष्काराने निर्माण होणारी कुंचबणा इ. चं ठसठसणारं गळू पखाली' तून थेंबाथेंबानं कसं गळते याचं मर्मभेदी चित्रण या कादंबरीत लेखकाने उभं केलं आहे. सागर किनाऱ्यावर राहूने मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या जीवनावर अनेक कथा-कादंबऱ्या आल्या, पण महाराष्ट्राच्या अंतर्भागात राहणाऱ्या या कोळी जीवनाचं समग्र दर्शन घडविणारी 'पखाल' ही एकमेव कादंबरी असावी, ती निश्चितचे लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like