या पुस्तकाविषयी
साईं मुखें म्हणा
'साई हरिपाठ' या सतीश काळे यांनी ध्यानावस्थेत उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या ओवीबद्ध ग्रंथाचे आहे. 'हरिपाठ' हा शब्द उच्चारताच आपणास माऊलींचे स्मरण होते. सर्वसाधारण जनांना सूत्ररूपाने भक्तिरहस्य सोप्या भाषेत सांगणारा ग्रंथ म्हणजे 'हरिपाठ' नारदाचार्य व शांडिल्याप्रमाणे हरिपाठ म्हणजे भक्तिसूत्र होय. अंतरंगाचा एक कप्पा या हरिपाठाने व्यापला आहे. निष्ठा, श्रद्धा यांची अंधश्रद्धा या संवोधनाने खिल्ली उडविणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना हरिपाठाच्या माधुर्याची गोडी कळणे शक्य नाही.
'साई हरिपाठ' माऊली, नामदेव, निवृत्तीनाथांप्रमाणे साईंनी जरी लिहिलेला नाही तरी साईंच्या जीवनचरित्रातून, भक्तांच्या अनुभवातून व स्वतःच्या चिंतनातून सतीश काळेंनी जे भक्तिसार काढले त्याचेच ओवीवद्ध रूप म्हणजे 'साई हरिपाठ' होय. स्वतः साईनीच सतीश काळेंना ह्या लिखाणाची प्रेरणा व अधिकार दिला. तसाच अधिकार विजय हरि वाडेकरांना त्यावर निरूपण लिहिण्याचा दिला. या हरिपाठाचे विवरण लिहिताना वाडेकरांनी बुद्धीने तर्कनिष्ठ, बहुसंख्य भोळे भावडे भाविक या साऱ्यांना सहजगत्या समजेल अशी शैली स्वीकारलेली आहे. भाविकांना येणारे अडथळ्यातून वाहेर पडण्याचा राजमार्ग कळेल.
'साईभक्त म्हणे । ठेवा एक जाण ।
होईल कल्याण । याव मार्गी ।।
अशा आत्मवोधाची खाण असलेल्या, सच्चिदानंद पख्रह्माचे विग्रह असलेल्या श्रीसाईनाथांची कास जो धरील तो 'सतईश' अथवा 'हरि' चा 'विजय' न झाला तरच नवल म्हणावे लागेल
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.