या पुस्तकाविषयी
डॉ. सतीश चतुर्वेदी हे एक मानवतावादी आणि कुशाग्र बुद्धी लाभलेले एक उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी राज्यशास्त्र, इतिहास आणि हिंदीमध्ये एम.ए. आणि त्यानंतर एल.एल.बी., पीएच. डी. (इतिहास) आणि डी.लीट. (इतिहास) या पदव्या प्राप्त केल्या आहेत. पदवी स्तरांवर इतिहास या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने विश्वविद्यालयाने त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या विविध पैलूंचा अभ्यास करून एक नवीन दृष्टिकोन या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडला आहे. २०१२ मध्ये त्यांना 'विदर्भातील गांधीवादी चळवळी : १९२० १९४२' या विषयावरील प्रबंधासाठी पी.एच. डी. तर २०१५ मध्ये 'ट्रांसफर ऑफ पॉवर : ढिलाईट ऑफ इंडियाज इन्डिपेन्डन्स'साठी डी. लीट. ह्या पदव्या नागपूर विद्यापीठाकडून बहाल करण्यात आल्या. त्यांचे दोन्ही शोधप्रबंध संशोधक आणि विद्वानांसाठी मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शक ठरलेले आहेत. इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची आवड असल्याने त्यांनी भारतीय राजकीय क्षेत्रात सामाजिक बदलांसाठी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. जवळपास ११ वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषविले तर एकंदर २५ वर्षे पूर्व नागपूरचे आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेली लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षणसंस्था ही महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संस्था आहे. ही संस्था देशभरातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील शिक्षण देण्याचे कार्य करते. डी. लीट. च्या शोध प्रबंधावर आधारित हे पुस्तक स्वातंत्र्यसंग्रामामध्ये बलिदान केलेल्या आणि संघर्ष केलेल्या देशभक्तांना व त्यांच्या गौरवास्पद कार्याला एक आदरांजली आहे आणि सोबतच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि भारतातील राजकीय नेत्यांच्या अमूल्य बलिदानाला आणि संघर्षाला समोर आणण्याचा हा एक अल्पसा आणि विनम्र प्रयत्न आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.