शैलीमीमांसा

Shaileemeemansa

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१८२
ISBN
9788194460022
भाषा
मराठी

₹३२५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

शैलीमीमांसा या ग्रंथाची मांडणी 'सिध्दान्त आणि उ प य T अशी' अशी दोन भागांत केली आहे. सैध्दान्तिक विचार मांडतांना डॉ. दिलीप धोंडगे यांनी प्रस्तुत विषयाच्या आजवरच्या अभ्यासाचे चिकित्सक परिदर्शन घडवले आहे; परिणामतः त्याला अद्ययावतता आली आहे. आणि मुख्य म्हणजे सैध्दान्तिक विचाराच्या प्रतिपादनार्थ मराठी काव्याची उदाहरणे पुरविल्यामुळे विचाराचे वैश्विक स्वरूप स्पष्ट झाले आहे. उपयोजन या भागात काव्य, कथा आणि कादंबरी यांची विश्लेषणे सादर केली आहेत. काव्यांत श्रीज्ञानदेव ते अरुण कोलटकर यांचे काव्य असा मोठा पट कवेत घेतला आहे. कथा- कादंबरीचा विचार करताना अनायास दुर्लक्षित विषयांकडे लक्ष पुरविले गेले आहे. शैलीमीमांसा करतांना डॉ. धोंडगे यांचे ओल्या मुळासारखे मन समीक्षा व्यवहाराच्या कठीण खडकालाही कसे सहज भेदते, याचे रम्य दर्शन प्रस्तुत पुस्तकात सर्वत्र घडते. एका आधुनिक विषयावर स्वतंत्र ग्रंथ सिध्द करून डॉ. धोंडगे यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने दमदार पाऊल टाकले आहे, याचा कोणाही अभ्यासकाला मनःपूर्वक आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dr. Dilip Dhondage

डॉ. दिलीप धोंडगे | Dr. Dilip Dhondage

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Dilip Dhondage

डॉ. दिलीप धोंडगे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like