श्वास

Shwas

लेखक Prof. Sunil Torane
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०१६
पृष्ठे
१६१
ISBN
978-81-932269-3-3
भाषा
मराठी

₹१७०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

प्रस्तुत काव्यसंग्रहातील काव्य हे त्यांच्या जीवनानुभवाचे आणि आकलनाचे विश्व आहे. घरातील गरीबी, तडफड, आई-बाबा, भाऊ यांच्यातील भावपूर्ण नाती यातून कवी प्रा. सुनिल तोरणे उमलत गेले आहेत. परिस्थिती आणि घटना यावरील भाष्येही अत्यंत साध्या पण भावपूर्ण शब्दात त्यांनी प्रकट केली आहेत. लहानपणापासून भोगलेली विषमतेची दाहकता पचवून 'नाती' ही कविता लिहिताना 'धर्माची नाती तोडून मानवतेची नाती जोडा' असा संदेश दिला आहे. ते दुष्ट विचारांना संपवून प्रेम वाढविण्याचा संदेश देतात. कटू जीवनानुभव पचवून एक छान विवेकी विचार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. माहुलीतील एक आदर्श व्यक्तिमत्व परमादरणीय कै. कुंभार गुरुजी हे खूपच अगोदर आमच्यातून निघून गेले ते अवघ्या गावाला दुःखाच्या खाईत लोटून गेले. ते दुःख कवीलाही झालेले आहे. याची तगमग 'गुरुजी' या कवितेतून कवीने अत्यंत भावूक आणि टोकदार व्यक्त केली आहे. वसुंधरेचं बदलतं रुप भयानक आहे. तापत जाणारी धरणी मानवी जीवनाला उध्वस्त करत आहे. त्यातील माणूस नावाची प्राण्याची जात शिल्लक आहे. त्या जातीने या बाबत धरा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत हा विचार कवीने 'अस्वस्थ आहे ही धरा' या कवीतेतून व्यक्त केला आहे.

मानवी जीवनातील अनेक विकार, तृष्णा, भूक या काव्यसंग्रहातून ठायी ठायी स्पष्ट होतात आणि याला सकारात्मक विचारात बदलून कवी प्रत्येक ठिकाणी आशावाद व्यक्त करतो हे या काव्यसंग्रहातील वैशिष्ट्य आहे. कवीचा हा आशावाद रसिकांच्या अंत:करणात रुजावा आणि दुःख, दैन्य, दाहकता याच्या पलिकडचं जीवन जगता यावं हाच या काव्यसंग्रहाचा हेतू आणि परिणाम आहे असं मला वाटत.

इंद्रजीत देशमुख

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like