या पुस्तकाविषयी
'फेसबुक 'वरचा मनस्वी कवी
मराठी कवितेच्या जाणकारांना कंसू प्रीतम है नाव अनोळखी नाही. गेली चाळीस वर्षे कविर्ताची बाग त्यांनी मोठ्या परिश्रमांनी फुलवली, अनेक वैयक्तिक आणि कौटुंबिक आघात पचवूनही त्यांची कविता जर्जर झाली नाही. उलट निकटवर्तीयांच्या सततच्या आग्रहाने ती अधिक टवटवीत होत गेली, आपल्या वैयक्तिक जीवनातील दुःखे आणि आपत्ती त्यांनी सातत्यानं समाजात आढळणाऱ्या विसंगतीशी ताडून पाहण्याची तटस्थ वृत्ती बाळगली, त्यामुळेच त्यांच्या प्रेमकवितातही नकळत या तटस्थतेचे प्रतिबिंब जाणवते,
आरंभी गुरुनाथ धुरी, मनोहर ओक या मराठीतील 'ट्रेंडसेटर' कवींचं मार्गदर्शन लाभल्यानं त्यांची कविता प्रसन्न होत गेली, वयपरत्वे परिपक्व होत गेली. पण आपलं चिरतारुण्य तिनं अबाधित राखलं,
'फेसबुक'च्या प्रसारानंतर कंसूच्या कल्पनांना अधिक मौकळ प्रांगण लाभलं. एखाद्या आघातानं नैराश्यावस्थेत जाणारी त्यांची कविता अधिक प्रगल्भ होत गेली. रसिकांची 'फेसबुक'वर मिळणारी 'इन्स्टंट' दाद कंसूच्या कल्पनांना उंचच उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करीत गेली. दर दिवशी एक उत्तम कविता 'फेसबुक' वर टाकणारा कवी, अशी त्यांची प्रतिमा सोशल मीडियात रूढ झाली आहे. बहुप्रसवता आली तरी शब्दांवरील आणि रचनेवरील त्यांचं प्रभुत्व हरवलं नाही.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.