Availability: In Stock

चिंचेवरले भूत आणि इतर गोष्टी | CHINCHEVARLE BHOOT ANI ITAR GOSHTI

200.00

ISBN –9788119258642

Publication Date – 2/10/2024

Language – Marathi

Pages – 120

Already sold: 0/100

Description

जितेंद्र कुवर हे महाराष्ट्र शासन सेवेतील अधिकारी आहेत. तसेच कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. विचेवरलं भूत आणि इतर गोष्टीं’ या कथासंग्रहामधून ते कथाकार म्हणून आपल्यासमोर येत आहेत. था संग्रहातील नऊ कमांमधून किशोरवयीन भावविड नेमकेपणाने उलगडते, पाने, फुले, झाडे, नदी, डोह, पशु, पक्षी, खोपा यांच्या सहवासात घडत जाणारे बालमनाचे भोवतालमान या कथांमधून प्रामुख्याने वाचकांसमोर येते. घडत जाणारे संवेदनशील बालमन आणि किशोरवयीन अवस्था या कथांचा केंद्रबिंदू आहे. या कांत लहानग्यांच्या नजरेतून साध्याच्या घटनाप्रसंगातून एखादा अनुभव फुलवत नेतात व विस्मयकारक पद्धतीने साकार करतात. पटनांचा विकासक्रम आणि काळाचे अंतर से बदलत्या जीवनभानाचे प्रकटीकरण त्यांनी या कयात सापले आहे. बालमनाला भुरळ घालणारे अथवा भीती दाखवणारे घटना प्रसंग तसेच स्थळांचे वाढत्या वयाबरोबर त्याविषयी बदलत गेलेल्या आणिवांचे त्यांनी मथार्थ सूतोवाच यांत केले आहे. किशोरवयीन मुलाने निरागसपणे नोंदवलेल्या त्याच्या अनुभवाच्या या स्माणमाखळ्या आहेत. यातील एकेक कड़ी म्हणजे, जीवन बांधणारा, व्यक्तिमत्त्व उजळून टाकणारा एक एक प्रसंग, तन्मयतेने कथन केल्यामुळे हा प्रसंग आपल्यासमोर साक्षात पड़ती आहे असा वाचनानुभव येतो. किशोरवयीन अनुभव आणि विस्मयकारकतेने घटनाप्रसंग टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हे कथालेखन वाचनीय झाले आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रणबिंद वापरून घटनाप्रसंगांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनांपट कुवर यांनी उभा केला आहे. त्यामध्ये वाचक सामावला जातो. या कথा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना संपत्र वाचनानुभव देणाऱ्या आहेत. जाणकार मराठी वाचक निक्षितपणे या कथांचे स्वागत करतील अशी आशा आहे.