Description
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने स्त्रियांच्या लेखनप्रवासाचा त्यातही इ.स. १९८० नंतरच्या स्त्री- कथाकारांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेण्याचे निश्चित केले. हा अभ्यास मराठी भाषेतील स्त्री-लेखकांपुरता मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याच्या हेतूने हिंदी, गुजराथी, कन्नड व सिंधी भाषक स्त्रियांनी निर्माण केलेल्या कथांचाही त्यात समावेश करून मराठी विभागाने तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले. प्रस्तुत चर्चासत्रात महाराष्ट्र, भोपाळ, दिल्ली, बडोदा आणि बेळगाव या भौगोलिक परिसरातील अभ्यासकांनी व्यासंगपूर्ण सहभाग दिला. त्यांचे निबंध येथे ग्रंथरूपाने अभ्यासक वाचकांसाठी सादर करीत आहोत. उपरोक्त पाचही भारतीय भाषांमधील स्त्री-कथाकारांचा वैशिष्ट्यपूर्ण कथाप्रवास वाचकांना समजावून सांगण्यास हा ग्रंथ निश्चितच सहाय्यभूत ठरेल असा विश्वास वाटतो.