Description

बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी’ हा जितेंद्र कुवर यांचा तिसरा कथासंग्रह आहे. यातील कथा किशोरवयीन मुलाच्या नजरेतून ग्रामीण भागाचे दर्शन घडवतात. यात ग्रामजीवनाशी संलग्न असलेले प्राणी, पशुपक्षी, काही श्रद्धा, मिथके यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. बालमनावरील याबाबींचा परिणाम आणि त्यांनी दिलेला निरागस प्रतिसाद ह्या कथांत चितारलेला आहे. किशोरवयीन मुलाच्या आकलनक्षमतेने उभे केलेले हे चित्रण आहे. ह्या चित्रणात काही प्रासंगिक नर्म विनोदाचे, काही अव्यक्त भयाचे, तर काही कातरहळवे संवेदनशील मनाचे प्रकटीकरण होते. ह्या कथा मनावर खोलवर बिंबले गेलेले गतकाळाचे गारूड वाहून आणतात. छोट्या छोट्या प्रसंगातून निर्माण झालेले पेचप्रसंग, ते सोडवण्यासाठी केलेला उपद्व्याप, प्रसंगी झालेला अनपेक्षित शेवट आणि त्याला किशोरवयीन मनाने दिलेला प्रतिसाद ह्या कथांतून दिसून येतो.

ह्या कथा किशोरवयीन मुलांना गोष्टींचे एक नवे दालन उघडून देत आहेत. यातील कथा प्राणी, पशुपक्षी, झाड ह्या घटकांवर चितारल्या आहेत. निसर्गाकडे कनवाळू आणि संवेदनशील मनाने पहावे हे ह्या कथांचे प्रयोजन आहे. ह्या कथा प्रौढ वाचकांसाठी देखील वाचनीय ठरतील. प्रौढांना त्या नकळत त्यांच्या बालपणात घेऊन जातील. काही कथा आपल्याच आजुबाजूला घडल्याचे त्यांना स्मरण होईल आणि त्याकाळात प्रवेश करून त्याची मौज प्रौढ वाचकांना अनुभवता येईल. करिता हा कथासंग्रह सर्व वयांतील वाचकांसाठी वाचनाचे समृद्ध साधन ठरावा असा आहे.

आबा महाजन

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bibtya, Waghachya Mishya Aani Itar Goshti | बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *