Availability: In Stock

Changdev Chatushtyasambandhi | चांगदेव चतुष्ट्यासंबंधी

850.00

Isbn : 9788196088804

Publication Date : 01/05/2001

Pages : 493

Language : Marathi

Description

निकोप अभिरुचिदृष्टीने पाहिले तर नेमाडे यांच्या ह्या कादंबरीचतुष्टयाला प्रतिरोध असू नये अशा प्रकारची अपवादात्मक गुणवत्ता असलेली ही कादंबरीरचना आहे. खरे तर संरचनेच्या दृष्टीने हे कादंबरीचतुष्टय महाकाव्यसदृश आहे. त्यामध्ये मानवी मनाचे व जीवनाचे, समाजरचनेचे व समाजरहाटीचे, सांस्कृतिक जीवनाचे व सांस्कृतिक व्यवहाराचे अंतर्वेधी चित्रण करणारी अनेकविध आशयसूत्रे आहेत. ह्या कादंबऱ्यांनी मुंबई, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र व मराठवाडा एवढा भौगोलिक अवकाश तर व्यापलेला आहेच, शिवाय भाषिक वैशिष्ट्यांसह स्थानीय स्वरूपाचे अंतरंगदर्शन घडविले आहे. प्रतिभेचा दांडगा आवाका असणाऱ्या ह्या कादंबरीकाराने अनेकविध सौंदर्यनिर्माणक परिकल्पना योजून ह्या साऱ्याची गुंफण करून साधलेला रूपबंध म्हणजे प्रस्तुत कादंबरीचतुष्टय होय. नेमाडे यांनी प्रस्तुत कादंबरीचतुष्टय लिहून मराठी कादंबरीचे एक वेगळे, महाकाव्यसदृश रूप घडविले आहे. प्रतिरोधाचे आणखी एक कारण म्हणजे या समीक्षक वर्गाची मानसिकता. १९६०च्या आधीच्या लेखकसमीक्षकांचा वर्ग रूढ नैतिकतेला अनुसरून मध्यमवर्गीय जीवनाची मूल्ये पत्करलेला आहे. नेमाडे यांची कादंबरी रूढ पारंपरिक मध्यमवर्गी मूल्यसरणीवर, त्याच्या आत्मसंतुष्टपणावर, इतरांबद्दल असणाऱ्या त्याच्या तुच्छताबुद्धीवर आघात करणारी, त्यांचा दंभस्फोट करणारी आहे. नेमाडे यांची कादंबरी जणूकाय आपल्याला उघडे पाडीत आहे असे ह्या समीक्षकवर्गाला वाटत असणार. वस्तुतः नेमाडे आपले कादंबरीलेखन कोणत्याही पक्षपातीपणाने कोणत्याही वर्गावरती प्रहार करण्याच्या हेतूने करीत नाहीत, हे त्यांच्या कादंबरीचे नीट आकलन केले तर कळून येण्याजोगे आहे. श्रेष्ठ लेखकाच्या ब्रीदाप्रमाणे आपण सगळ्या जगासाठी लिहितो ही कादंबरीकार म्हणून नेमाडे यांची धारणा आहे.

Additional information

Book Editor

Rajan Gavas | राजन गवस