Description
‘मेघवृष्टी’ या जयराम खेडेकर यांच्या काव्यसंग्रहात खेडेगावाचा गतकाळ व बदलता वर्तमानकाळ अभिव्यक्त झाला आहे. खेड्याच्या क्षेत्रातील संवेदनशील व भाविक कविमनच येथे पहावयास मिळते. खेड्यातल्या वृत्तीप्रवृत्ती, जगणे – मरणे आणि शृंगारणेही हे कविमन मांडते आहे. वास्तवदर्शन आणि हुरहुरीची भावना असा सांधा जुळविण्याचा प्रयत्न या कवितांमध्ये आहे. आजी, जुने वाडे, घट्ट जपलेली नाती, ग्रामीण स्त्री, बैल, आई, सून, वांझकूस, पीकपाणी, दुष्काळ, बदलती व ढासळती ग्रामीण मूल्यव्यवस्था अशी काही ठळक आशयसूत्रे येथील कवितांमधून जाणवतात.
खेडेगावातील दैन्य, दारिद्रय व बदलती मूल्ये यांचे दर्शन घडविताना या कविमनात विषण्णताही दाटून येते. गावातल्या घटना कथाकाव्य बनतात. परिवर्तनशील वास्तवाचा वेध घेताना भावी काळाची दिशाहीनता हा कवी दाखवतो.