Description

‘राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस’ हे एक अंकी बालनाट्य असून यात किशोरवयीन मुलं व एका राक्षसाच्या अनपेक्षितपणे घडलेल्या भेटीचा प्रसंग चितारण्यात आलेला आहे. राक्षस प्राचीन युगातून पाण्याच्या शोधात ह्या युगात येऊन पोहचला आहे. तहानेने तो व्याकूळ झाला आहे. त्याला नदीचा शोध आहे. त्याचा नदीचा शोध आणखी एका खास कारणासाठी आहे. राक्षस व शाळकरी मुलांच्या भेटीनंतर विविध खुमासदार प्रसंग या नाटिकेत येतात. प्राचीन काळातील दैनंदिन व्यवहार व आजच्या युगातील व्यवहार यांतील तफावतीमुळे राक्षस गोंधळतो. सर्वच गोष्टी त्याला नवीन आहेत. तर राक्षसाच्या नियमित वागण्याला मुलं विक्षिप्त समजतात. राक्षसाबद्दल वाटणारी भीती, जिज्ञासा यामुळे अनेक प्रसंगांतून मनोरंजन घडते. नाटिकेत पुढे गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध आणि प्रतिकार करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे यासारखे प्रसंग येतात. यांतून किशोरवयीन मुलांचे मूल्यशिक्षण आणि प्रबोधन साधले आहे.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajkumar Aani Natak Companitala Rakshas | राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस”

Your email address will not be published. Required fields are marked *