Description
‘’माझ्या ‘शिवराम’ कादंबरीचा नायक कष्टाळू, प्रेमाळू, दयाळू, कनवाळू, स्वप्नाळू कणखर व स्वाभिमानी असा आहे.तो मेंगळट नाही तर जशास तसे उत्तर देणारा आहे. तो प्रेमवीर आहे. पण पळपुटा म नाही. पिडीत व अन्यायग्रस्त स्त्रीयांचं रक्षण हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. संकटात असलेल्या माताभगिनींच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा असा माझ्या कादंबरीचा नायक आहे. कायद्याचा सन्मान करणारा पण वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणारा, दुःखाच्या कठिण प्रसंगी धावून येणारा, गरीबास मदत करणारा, कर्णासही लाजवील असा माझ्या कादंबरीचा नायक आहे.