Availability: In Stock

Tukaram-Ahiranit Nirupan | तुकाराम – अहिराणीत निरूपण

525.00

ISBN – 9788119258222

Publication Date – 10/06/2023

Pages – 299

Language – Marathi

Description

डॉ. पाटील अहिराणी भाषा प्रदेशात अहिराणीतून अध्यात्मकथन, प्रवचन, अध्यात्मिक संवाद करीत असतात. खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर ‘ग्यानबा-तुकाराम’ ‘रामकृष्णहरि’ ‘जय हरि’ हा गजर होत आला आहे. महाराष्ट्र संस्कृती ही वारकरी संस्कृतीच होय. भजन, पूजन, किर्तन, नामजप, हरिनाम सप्ताह, वारी-दिंडी, एकादशी, अष्टगंध ही महाराष्ट्र संस्कृतीची प्रतिके आहेत आणि जीवनसाधना मार्गही आहेत. अनेक उत्सवांमध्ये वारकरी जीवनतत्वांचे आचरणही होत आले आहे.हे सारे लक्षात घेऊनच डॉ. एस. के. पाटील यांनी संतश्रेष्ठ तुकोबांचे अभंग येथे अहिराणीतून उलगडून दाखवले आहेत. तुकोबांची अभंगगाथा घरोघरी पोहचली आहेच, आजच्या आपल्या मराठी भाषकांच्या ओठी-पोटी सर्वाधिक पोहचलेले आहेत, ते तुकोबा. तुकोबा हे श्रवण-पठण, मनन, भजन, किर्तन या मार्गाने पिढ्यानुपिढ्या धडे देतात आणि सडेतोडपणे खडसावतातही आणि म्हणूनच डॉ. पाटील यांनी तुकोबांच्या अभंगांचे अहिराणीतून सार्थ कथन घडवलेले आहे.अभंगाचे अहिराणीतले हे अर्थकथन प्रत्येक वाचकाला विचारप्रवृत्त करते, आपल्याला उद्देशूनच हे खडे अहिराणी बोल सुनावले आहेत असे वाटू लागते. लोकसंवादशैलीचा अप्रतिम कथनप्रयोग म्हणूनही हे लेखन परिणामकारक बनले आहे.आपल्या बोलीतून तुकोबाच संवादी झाले आहेत, असे वाटू लागते आणि अध्यात्मही भक्तीसुलभ- अर्थसुलभ होऊन जाते. डॉ. एस. के. पाटील यांच्या अर्थविवरणाला ‘जय हरि’ म्हणत प्रतिसाद देणे आवश्यकच ठरले आहे. अहिराणीतले तुकोबा सर्वच भाषकांना नव्या अर्थप्रतीतीसाठी सिद्ध करीत आहेत, ही आजच्या काळातली सुंदर आणि चांगलीच गोष्ट आहे.

Additional information

Book Author