Description
चोषक म्हणजे चोखणारं, शोषणारं, वर ओढून घेणारं असं फलोद्यान. जगण्याकडं पाहण्याच्या अपरिमित शक्यतांपैकी एक शक्यता. या कादंबरीतला गर्भित लेखक त्याच्या तरुण वयात स्त्री-पुरुषांमधल्या नेत्रयुग्मांच्या मिथुनाचं एक असाधारण दृष्य पाहतो. तेवढ्या एका अनुभवानं त्याचं लेखन किंवा त्याचं एकूण जगणंच प्रभावित होतं. त्याच्या जगण्याच्या अखेरच्या थांब्यावर तो त्याची गोष्ट सांगतो. पण ती ऐकायला किंवा त्यातील सत्यासत्यता पारखून घ्यायला त्याच्या सोबत कोणीही नसतं. आपल्या जगण्याची गोष्ट रचण्याचा तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो.अनेक भ्रामक सत्यांतून सत्याच्या गाभ्याशी जाण्याचा एकाकी प्रयत्न करतो. त्यातून निर्माण झालेलं हे असंख्य भ्रमांचं असंबद्ध-कदाचित सुसंबद्ध-अरण्य. चोषक फलोद्यान !