Description
ही कादंबरी सर्वांनी वाचण्यासाठी आहे. विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य वाचक सर्वांनाच ही कादंबरी अंतर्मुख व्हायला भाग पाडेल आणि पर्यावरणाचा वसा घ्यायलाही ! पर्यावरण आपल्याला जगवते, अन्न-पाणी- हवा देते. परंतु निसर्गातील घटकांचा अती गैरवापर करून आपण अनेक ठिकाणी ढवळाढवळ केली आहे. वृक्षतोड, जंगलतोड यांचा परिणाम प्रदूषण वाढण्यात होतो. प्रसन्न, निरोगी व आनंदी जीवनसृष्टी असण्याकरिता सर्व निसर्गनिर्मित घटकांचे जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे लेखिकेस वाटते. निसर्गातील प्रत्येक जीव, प्रत्येक घटक उपयुक्त आहे. फळांची चव वेगवेगळी, फुलांचा गंध वेगळा, नैसर्गिक घटकांचे संवर्धन, संरक्षण करून आर्थिक विकास करावा, जेणे करून निसर्गसौदर्य अबाधित राहील. आपले जीवन सुखकर होईल. निसर्ग जगला तरच आपण जगू शकू. ‘स्वच्छ हवा, शुध्द पाणी आरोग्याची गाऊ गाणी’ असेच लेखिकेस म्हणायचे आहे.