Description
डॉ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी मराठीचे नामवंत अभ्यासू प्राध्यापक असून १९८३ ते २००५ अशी २२ वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिले. विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांची मानाची व महत्त्वाची पदे त्यांनी दीर्घकाळ अनुभवली आहेत. प्रशासनाच्या व्यापात व्यग्र, तरीही वाचन, लेखन व व्याख्याने- प्रवचने यांना त्यांनी विराम दिला नाही. आजही ती साधना चालूच आहे. विशेष म्हणजे आपल्या असंख्य सर्वसामान्य, गोर- गरीब विद्यार्थ्यांचे हित त्यांनी आत्मियतेने जपले. त्यांना योग्य मार्ग दाखविला. त्यांच्या लेखन-संशोधनाला चालना दिली. आपल्या सहकार्यांची मने जिंकली. १२ समीक्षा ग्रंथ, २५ हून अधिक ग्रंथात लेख, २१ पुस्तकांना प्रस्तावना, ३५ विद्यार्थ्यांची पीएच.डी., एम.फील. पूर्तता, वक्ते म्हणून बृहन्महाराष्ट्रात ओळख, ही डॉ. गिरिधारी यांची उपलब्धी आहे. डॉ. गिरिधारी यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून शुभेच्छा !!