₹150
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
अफवा खरी ठरावी म्हणून...
₹150
About This Book
'अफवा खरी ठरावी म्हणून...' माझ्या एका कवितेचं हे शीर्षक, तेच या कथासंग्रहाला दिलं आहे.
अफवेबद्दलच्या बऱ्याच अफवा आपल्याकडे प्रचलित आहेत. अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकारात्मकच असते इत्यादी. हे तर खरंच. ठायी ठायी आपण ते अनुभवतोही. पण अफवेचं अफवापण हे संपूर्ण सत्य किंवा संपूर्ण असत्य असण्यात नाही तर जे आहे अथवा नाही असं सांगितलं जातं, त्याला ठोस आधार नसणं यात आहे.
तसंच अफवेचं आणखी एक रूप आहे ते म्हणजे 'पाईप-ड्रीम'चं दिवास्वप्नांचं. अर्थात दिवास्वप्नांचाही जो अर्थ आपल्या चलनात आहे तेवढी नकारात्मक शेड इंग्रजीतल्या 'पाईप ड्रीम'ला नाही. थोडं शब्दांशी खेळत सोपंच बोलायचं झालं तर 'पाईप'मध्ये जरी 'ड्रिम' असलं तरी लांबवर का होईना पण पाईपचं दुसरं तोंड खुलं असतं आणि त्या दिशेने ते स्वप्न सत्य बनून उमलण्याची शक्यता असते. हा आशावाद निरंतर जिवंत ठेवणाऱ्या अफवा फैलावणं हे काम यथार्थच ठरावं; कारण दूर क्षितिजावर का होईना पण आदर्शाचा लुकलुकता दीपस्तंभ नसेल तर जगण्याच्या लंब्याचौड्या पाईपमधून प्रवास करणं अवघडच.
माझ्या कथेतील आशयसूत्रांचा, त्यातील सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा 'वापर' कसकसा होईल, हे आज तरी मला माहीत नाही. पण दलित समाजाची स्थिती बघा, कशी झपाट्याने बदलली आहे, ते काय लिहिताहेत, कसं जगताहेत असं जर कुणी या कथांचा आधार घेत म्हटलं तर मी म्हणेन की होय, तशी अफवा प्रसृत करणं हे लेखक म्हणून माझं उत्तरदायित्वच आहे.
. बदलाची आत्यंतिक आस बाळगणारी बाई म्हणून.
Book Images
About the Author
Pradnya Daya Pawar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review