या पुस्तकाविषयी
रामभाऊंकडून प्रत्येक गाण्याच्या निमित्तानं नवीन काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडे मी जे गायलं, त्याबाबत ते माझ्या गुरुस्थानी होते. एकदा त्यांनी सांगितलं, 'अहो उषाबाई, लावणी म्हटलं तरी त्यात प्रकार आहेत, पद्धती आहेत. बैठकीची लावणी, बोर्डावरची लावणी, उभी लावणी, हळीची लावणी, म्हारकीची लावणी असे अनेक प्रकार आहेत. लावणी गीताचा ढंग, बाज लक्षात घेऊन गावं लागतं.' त्यांना स्वतःला असं शब्दोच्चाराचं वैविध्य चांगलंच अवगत होतं. एकदा एका गीतात 'मल्हारी' हा शब्द होता. तो शुद्ध स्वरूपात न उच्चारता 'मल्हारी' हा कसा उच्चारायचा, ते त्यांनी मला स्वतः गाऊन दाखवलं. 'कंबरपट्टा' हा शुद्ध शब्द म्हारकीच्या लावणीत येतो, तेव्हा 'कमहरपट्टा' असा गायला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. आवाजातले सूक्ष्म शब्दोच्चार त्यांना हवे तसे ते गाऊन दाखवायचे, गाऊन घ्यायचे. उषा मंगेशकर रामभाऊंकडचं माझं पहिलं गाणं 'अशी कशी ओढ बाई' उषाताई मंगेशकरांबरोबर ध्वनिमुद्रित करायला मला बोलावणं आलं. मी पहिल्यांदाच रामभाऊंना औपचारिकरीत्या भेटत होतो. खरं तर घाबरलेला ! एवढा मोठा संगीतकार, ज्यांच्याकडे त्या वेळचे झाडून ए टू झेड गायक-गायिका गात होते. मी एकदम नवा नवा! पांढरी पँट, पांढरा शर्ट (इन केलेला) व डोक्यावर पांढरी नेपाळीटाइप टोपी, अशा पेहरावात रामभाऊ हार्मोनियमवर सिंगर्स बूथमध्ये बसले होते. मी घाबरत आत गेलो. त्यांच्या पायाला हात लावून म्हणालो, 'मी सुरेश वाडकर!' रामभाऊंनी मोठ्या प्रेमानं मला शेजारी बसवलं. मी एकदम रिलॅक्स झालो. त्यानंतर मी त्यांच्याकडे खूप खूप काम केलं. सुरेश वाडकर
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.