arrow_back Back to Books
चिप

चिप

Chip

storefront Madhushree Publication
qr_code ISBN: 9788119812622
calendar_today 2023
menu_book 188 pages
₹250
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

हाताच्या तळव्यावर सहज मावणारी छोटीशी वस्तू म्हणजे, 'चिप.' या 'चिप'च्या आकारावर मात्र जाऊ नका! तिच्यामध्ये कायकाय करामती करण्याची क्षमता असते याचा विचार जरी केला, तरी आपली मती गुंग होऊन जाईल. एका सेकंदात अब्जावधी क्लिष्ट गणिती समीकरणं सोडवण्यापासून अनेक अवघड निर्णय घेण्यासंबंधीच्या कामांमध्ये मदत करण्यापर्यंत असंख्य गोष्टी या 'चिप'मुळेच साध्य होतात. आजच्या जगामधले जवळपास प्रत्येक काम या 'चिप'च्याच मदतीनं होतं. संगणक, मोबाईल, दूरसंचार, प्रवास, मनोरंजन, वैद्यकीय उपकरणं, उद्योगक्षेत्र, संशोधन, आरोग्य, अंतराळ प्रवास अशी यादी करत गेलो, तर संपणार नाही; पण यांमधल्या प्रत्येक गोष्टीचं सामर्थ्य या 'चिप'मध्येच दडलेलं आहे. आयटी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या 'सिलिकॉन व्हॅली'चं नावही मुळात या 'चिपं'मुळेच पडलेलं आहे. नेमकी काय करते ही 'चिप?' ती आली कुठून? तिच्या जन्मामागे आणि त्यानंतरच्या आजवरच्या प्रवासामध्ये काय भन्नाट गोष्टी घडल्या? तिचं कामकाज कसं चालतं? या आणि यांसारख्या असंख्य रंजक तपशिलांसह अत्यंत महत्त्वाच्या मुद्दयांचा सखोल ऊहापोह करणारं हे पुस्तक आहे. यात अनेक नाट्यं भरलेली आहेत, अनेक शास्त्रज्ञांच्या मनोहर कहाण्या आहेत. तसंच, ईर्ष्या आणि हेवेदावे यांचे पदरही आहेत. त्याचबरोबर, दुसरीकडे आपली तहान-भूक हरपून काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या स्वप्नामुळे भारून गेलेल्या महान मानवांच्या प्रवासाचा आलेखसुद्धा आहे. याच्याच जोडीला, त्यात 'तंत्रज्ञान' ही आहे आणि या विषयाला अनुरूप असं 'राजकारण' ही आहे!

Book Images

About the Author

person

अतुल कहाते | Atul Kahate

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like