arrow_back Back to Books
जोर की लगी है यार

जोर की लगी है यार

Jor Ki Lagi Hai Yaar

person Mahesh Keluskar
qr_code ISBN: 9789348054395
₹399 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

महेश केळुसकरांतील सहृदय लेखक विदारक सत्य सहजपणे पण झोंबणाऱ्या शैलीत कथन करतो तेव्हा तो वाचकालाही व्याकुळ करतो, अस्वस्थ करतो. मानवी जीवन, त्यातील गुंतागुंत, नात्यातील अनाकलनीय संबंध, सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील टप्पे, त्यांचे अन्वयार्थ लेखकाला चांगले उमगलेले असल्यामुळे त्याने लिहिलेल्या कथा वास्तव आणि प्रत्ययकारी वाटतात. केळुसकरांच्या कथांमधली माणसे तुमच्या आमच्या अवती-भवती भेटणारी सर्वसामान्य माणसे आहेत. त्यांची सुख-दुःखेही सर्वसामान्यांची आहेत. पण त्या सगळ्यामागे एक अथांग कारुण्य, खोल समजुतदारपणा, टोकाचा सोशिकपणा आणि माणसातील जनावराची अमानुष वृत्ती असे रसायन आहे. कविता, कथा, कादंबरी, आणि विनोद आदी वाङ्मय प्रकार हाताळताना केळुसकर जी प्रयोगशीलता प्रगट करतात, तिच्यामुळे त्यांचा आविष्कार ताजा, टवटवीत राहतो. निर्मितीमधील पृथगात्मता हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. केळुसकरांपाशी हे बळ आहेच. - मधु मंगेश कर्णिक

Book Images

About the Author

person

Mahesh Keluskar

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like