या पुस्तकाविषयी
'लेखा-जोखा'तील लेख हे साहित्यावर विचार मांडणारे असले तरी ते समीक्षेची विशुद्ध पातळी गाठणारे नाहीत. ह्याचं कारण सदरहू लेख लिहितानाची माझी धारणा अशी होती की, 'समीक्षेतील तार्किकता, मुद्देसूदपणा, निकष ह्यांचं व्यवधान बाळगतानाच त्यातील परिभाषाप्रचुरता वा ताटस्थ्य टाळून, वाचकाला साफ परकी वाटणार नाही अशी भाषा योजून जर त्याच्याशी संवाद साधला तर साहित्यविषयक वैचारिक मंथन घडवण्याच्या दृष्टीने ते जास्त कामाचं ठरेल.' साहजिकच 'लेखा-जोखा'तील लेख हे समीक्षेच्या कक्षेत बसू शकत नाहीत, ह्याचं मला पुरेपूर भान आहे. मात्र, साहित्यव्यवहाराकडे पुरेशा गांभीर्याने पाहणाऱ्या वाचकांना ह्या पुस्तकामुळे विचारांना चालना देणाऱ्या चार-दोन अनोळखी वाटा - अगदी पायवाटा जरी - गवसल्या तरी हे पुस्तक माझ्यासाठी सार्थकी लागेल. सतीश तांबे : लिखाणाला कवितांपासून सुरुवात. नंतर वृत्तपत्र माध्यमातून गद्य लेखनाला प्रारंभ. 'साप्ताहिक दिनांक' आणि 'आपलं महानगर' यांतून सदरलेखन. विविध नियतकालिकांतून अनेक कथा तसेच साहित्य व संस्कृती संबंधित अनेक लेख प्रकाशित. याशिवाय एकांकिकालेखन. नव्वदच्या दशकात, 'आजचा चार्वाक' हे दिवाळी वार्षिक आणि 'अबब! हत्ती' हे मुलांचं मासिक, यांच्या संपादनात सहभाग. सध्या जाहिरात-लेखनाचा व्यवसाय. प्रकाशित पुस्तके : छापल्या कविता (काव्यसंग्रह, १९८२), राज्य राणीचं होतं (कथासंग्रह, २००३) पुरस्कार : 'राज्य राणीचं होतं' या कथासंग्रहाला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार. 'बिन बायकांच्या जगात' या एकांकिकेला चतुरंग प्रतिष्ठानचा 'सवाई लेखक' पुरस्कार.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.