या पुस्तकाविषयी
मनोहर सोनवणे यांच्या कथांना जागतिकीकरणाचं नेपथ्य आहे. जागतिकीकरणामुळे भारताच्या सांस्कृतिक भावजीवनाला कीड लागली. शेकडो शतकांचं शहाणपण पोरकं झालं. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या झोपडीप्रमाणे देशाची अवस्था झाली. सोनवणे यांच्या कथांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. देशभर प्रचंड उलथापालथ होत असताना माणसात, त्याच्या/तिच्या कळत-नकळत झालेले बदल; एकीकडे नव्या युगाची आशा, तर दुसरीकडे सर्वदूर बेदिली; आपल्या वाट्याला आलेल्या सुख-दुःखाचा माणसाने लावलेला अर्थ; निरर्थकतेच्या बोगद्यातून सुरू असलेला नि कधीही न संपणारा जीवनप्रवास; सतत धारेला लागलेले सामाजिक-आर्थिक नि सांस्कृतिक व्यवहार; एकीकडे जगण्याला भिडण्याची जिद्द, तर दुसरीकडे हतबलता; स्वप्नांचं गाठोडं खांद्यावर टाकून माणसांची अंतहीन वणवण; श्रेयस-प्रेयस यांच्यातला झगडा, असा एक मोठा पट सोनवणे वाचकांसमोर मांडतात. सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन् संवेदनशीलही. त्यामुळे 'ब्रँड फॅक्टरी'ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय यात शंका नाही. - अंबरीश मिश्र (प्रस्तावनेतून)
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.