या पुस्तकाविषयी
और भी दुख हैं जमाने में, मोहब्बत के सिवा, राहतें और भी हैं, वस्ल की राहत के सिवा।
- फैज़ अहमद फैज़
प्रेम ही अत्यंत प्रबळ अशी नैसर्गिक भावना आहे, जिच्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत कठीण असतं. प्रेमात न पडलेला माणूस विरळाच. आपल्या जगण्याचा सारा आधारच प्रेम आहे. ज्यांना प्रेम लाभलं आहे ते खरे सुखी. पण ज्यांना ते लाभलं नाही त्यांचं काय ? प्रेमभंगाचं दुःख उरात बाळगत, काही लोक आयुष्यभर जळत राहतात, काही त्यात स्वतः सोबत इतरांनाही जाळून टाकतात. गालिब म्हणतो तसं, 'इश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश 'गालिब', कि लगाए न लगे, और बुझाए न बने।' प्रेम न लाभल्यामुळे, होरपळून निघालेली असंख्य माणसं, आपल्या अवतीभवती वावरत असतात. त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजला असेल का? ज्यांचं प्रेम यशस्वी झालं त्यांना तरी तो समजला आहे का? प्रेम ही मानवी जगण्यातील महत्त्वाची गोष्ट असली तरी तीच एकमेव महत्त्वाची गोष्ट नाही. प्रेमभंगाच्या असंख्य छटा दर्शवणारी आणि त्यावर तत्त्वज्ञानाच्या अंगाने उपाय सुचवणारी, 'गळ' ही कादंबरी, प्रेमात पोळलेल्या, आयुष्याला वैतागलेल्या, प्रत्येक दुःखी जीवाला नव्याने जगण्याचा उत्साह नक्कीच देईल.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.