काळ्या सूर्याखालच्या गोष्टी : निवडक कमल देसाई

Kalya Suryakhalchya Goshti : Nivadak Kamal Desai

लेखक Kamal Desai
संपादन Sanjay Arvikar
प्रकाशक
Lokvangmaya Griha
प्रकाशन वर्ष
२०१०
पृष्ठे
२०६
ISBN
9789380700083
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कमल देसाई यांची जीवनदृष्टी समग्रतेचा ध्यास असणारी आणि मानवी अस्तित्वासह साऱ्या सृष्टीला गवसणी घालणारी आहे. सृष्टी आणि आधुनिक माणूस यांच्यातील द्वंद्वाचा वेधही त्यांची प्रतिभा घेते. अस्तित्ववादी विचारसरणी, बौद्ध तत्त्वज्ञान आणि लोकायताची सूत्रे यांच्या संश्लेषणातून त्यांची जीवनदृष्टी उमललेली आहे. निर्मिती, शोध आणि खेळ या तीनही प्रेरणा त्यांच्या लेखनात एकवटल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही निर्माता, लहान मूल आणि तत्त्वज्ञ हे पैलू एकत्रित आले आहेत. साध्या लौकिक गोष्टींबद्दल बोलता बोलता एकदम तत्त्वज्ञानाकडे झेपावत साध्या खेळाचे वैश्विक खेळात रूपांतर करणे, याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात अनेकदा येतो. त्यांची प्रतिभा काळाचे अगदी सहजपणे 'खेळणे' करते. नैतिकता आणि मानवी मूल्य याबाबत त्यांची भूमिका ठाम आणि प्रखर आहे. प्रस्थापित मूल्यव्यवस्थेची चौकट खिळखिळी होईल इतके मूलगामी प्रश्न त्या उपस्थित करतात. स्खलनशील माणसाला असणारं पापाचं आकर्षण हे सूत्र त्या परत्तत्त्वात्मक बंडखोरीपर्यंत नेऊन भिडवतात. स्त्रीवादी प्रेरणा, स्वातंत्र्य, बंडखोरी, आधुनिकता, प्रयोगशीलता आणि चिंतनशीलता या सर्वच अंगांनी मराठी लेखिकांच्या कथात्म साहित्याच्या शिखरस्थानी अजूनही कमल देसाईच आहेत. संजय आर्वीकर

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like