या पुस्तकाविषयी
कथा ही माणसाइतकीच प्राचीन आहे. माणूस आपले अनुभव कल्पनेने जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा कथेचा जन्म झाला आणि त्याकाळी त्याच्या अवतीभोवती उपलब्ध असणाऱ्या रंग, रेषा, माती, दगड आणि शब्दांच्या माध्यमातून त्याने कथा सांगितल्या.
कथनाच्या क्रियेला कथक, कथा, श्रोता आणि ज्या माध्यमातून कथा सांगावयाची आहे ते शब्द, अभिनय, चित्र, दगड, माती इत्यादींपैकी एखाद दुसरे माध्यम, असे कमीत कमी चार घटक आवश्यक असतात. या अनुषंगाने नैसर्गिक कालक्रमानुसार 'घटनांचे घडणे' आणि 'घटनांचे कथन करणे' या दोन मिन्त्र स्वरूपाच्या कालात्म क्रिया आहेत. 'मूळ' गोष्टीतील घटनांची मांडणी ही नैसर्गिक कालक्रमानुसार होत असते. परंतु कथाकार आपल्या सर्जनशीलतेने या नैसर्गिक मांडणीला सौदर्यात्म रचनात्मक स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करीत असतो
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
डॉ. भटू वाघ यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.