या पुस्तकाविषयी
काही माणसं जन्मतः मोठेपण घेऊन येतात. काही माणसांवर मोठेपण लादलं जातं तर काही माणसं स्वतःच्या प्रयत्नांनी मोठी होतात. नामदेवराव स्वकर्तृत्वाने, स्वप्रयत्नाने मोठे झालेले आहेत. पंचनामा कथासंग्रह हे माझ्या मित्राच्या कर्तृत्वाचं दृश्य रूप. या संग्रहातल्या १३ कथा ह्या आजूबाजूच्या डोळस निरीक्षणातून साकारलेलं वेगळं जग आहे. माणसा-माणसांतल्या वेगवेगळ्या भल्या-बुर्या-वृत्ती-प्रवृत्ती येथे दिसतात. त्यांना खंत जरूर आहे. पण ती व्यक्त करताना ते कुठेही कडवटपणा येऊ देत नाहीत. हसत हसत सामाजिक व्यंगावर नामदेवराव नेमके बोट ठेवतात. खडा तर मारायचा पण तो अशा चातुर्यानं की, तो लागायचाच, पण लागून रक्त नाही निघणार. नामदेवरावांची कथा सहाकरातल्या विकृतींवर नेमके बोट ठेवते. त्यापाठीमागे त्यांचे मन सहकाराचा विशुद्ध गाभा निकोप रहावा यासाठी धडपडताना दिसते.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
कात्रण
नामदेवराव देसाई यांच्या ‘पंचनामा’च्या दुसऱ्या आवृत्तीचे श्रीरामपूरमध्ये प्रकाशन
शब्दालय प्रकाशनातर्फे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई यांच्या पंचनामा पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे श्रीरामपूरमध्ये…
दैनिक दिव्य मराठी – सिटी स्कॅन, पृष्ठ ४
कात्रण
शब्दालयच्या पुस्तकवारी पुस्तक दालन व प्रदर्शनाचे श्रीरामपूरमध्ये उद्घाटन
श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनच्या पुस्तकवारी पुस्तक दालन आणि पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी आमदार लहू कानडे यांन�…
दैनिक सार्वमत, पृष्ठ ४