प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी

Prativruttanta Satpatil Kulvruttant : Pratyaya Nondi

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
५७६
ISBN
9788197164798
भाषा
मराठी

₹९००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

२० जुलै २०१९ रोजी शब्दालय प्रकाशन संस्थेने 'सातपाटील कुलवृत्तांत' ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी प्रकाशित केली. (२० जुलै हा मा. पठारे सरांचा जन्मदिवस. म्हणून ती तारीख टाकली असली तरी कादंबरी सप्टेंबर २०१९ पासून वाचकांना उपलब्ध झाली.) तिला मिळालेला आणि अजूनही मिळत असलेला प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी आणि नाविन्यपूर्ण होता. तो सुखद धक्का देणारा आणि काहीसा आश्चर्यकारक सुद्धा होता. रंगनाथ पठारे हे महत्त्वाचे लेखक आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्यांच्या लेखनाला इतका त्वरित आणि भरघोस प्रतिसाद मिळण्याचा प्रकाशनाचा हा पहिलाच अनुभव. पुस्तक जाईल पण नेहमीसारखे हळूहळू जाईल असे आम्हाला वाटत होते. सप्टेंबर महिन्यात पुणे येथे प्रकाशन झाले आणि दोन महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली. या कादंबरीला वाचकांनी लगेचच दिलेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ही आमच्यासाठी अभूतपूर्व गोष्ट होती. या प्रतिक्रिया लेखनातून तसेच फेसबुकसारख्या समाज माध्यमातून देखील भरघोसपणे नोंदविल्या गेल्या. परिणामी केवळ अशा प्रतिक्रिया आणि प्रतिसादांचा समावेश असलेला 'शब्दालय'चा दिवाळी अंक २०२० मध्ये आम्ही प्रकाशित केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. विविध स्तरातील वाचकांच्या प्रतिक्रिया असलेल्या या लेखनाला वाड्मयीनदृष्ट्या संग्रहमूल्य आहे आणि म्हणून ते ग्रंथस्वरुपात राहावे, असे आम्हाला वाटत होते. या पुस्तकाच्या निमित्ताने तसे होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी — highlight प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी — highlight प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी — highlight प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी — highlight प्रतिवृत्तांत सातपाटील कुलवृत्तांत : प्रत्यय नोंदी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

Sumati Lande

सुमती लांडे | Sumati Lande

सुमती लांडे या मराठी कवयित्री, संपादक आणि प्रकाशक असून शब्दालय प्रकाशनाच्या संस्थापक आहेत. मराठी विषयात एम.ए., बी.एड. आणि एम.फिल. केल्यानंतर त्यांनी २२ एप्रिल १९८४ रोजी श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर) येथे पंचवीस हजार रुपयांच्या बँक कर्जावर ‘शब्दालय’ हे पुस्तकांचे दुकान सुरू केले. त्या…

संपूर्ण परिचय पाहा
More by Sumati Lande

सुमती लांडे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

प्रकाशन सोहळा

ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत ‘प्रतिवृत्तांत’ ग्रंथाचे प्रकाशन

रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीला वाचकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या निवडक नोंदींचे दस्तऐवजीकरण…